Sanjay Raut यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी Kirit Somaiya पोलीस स्टेशनमध्ये दाखल

Sanjay Raut यांच्याविरोधात तक्रार करण्यासाठी Kirit Somaiya पोलीस स्टेशनमध्ये दाखल

| Updated on: May 09, 2022 | 6:26 PM

संजय राऊतांवर टीका करताना किरीट सोमैया म्हणाले, की नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. प्रो. डॉ. मेधा किरीट सोमैया यांनी राऊतांविरोधात भादंवि 503, 506, 509 याअंतर्गत एफआयआर रजिस्टर करावी. 35 वर्ष शिक्षण क्षेत्रात त्या आहेत. भोंगा राऊत यांनी त्यांचे चारित्र्यहनन केले.

मुंबई : शिवसेने नेते संजय राऊत यांच्याविरोधात भाजपा नेते किरीट सोमैया (Kirit Somaiya) यांच्या पत्नी मेधा सोमैया यांनी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे. याकरता किरीट सोमैया, मेधा सोमैया आणि सर्व सोमैया कुटुंब पोलीस स्टेशनला पोहोचले. मुलुंडच्या नवघर पोलिसांत एफआयआर (FIR) अर्ज मेधा सोमैया यांनी दाखल केला आहे. सामनाच्या संपादकीय लेखात आपल्याविरोधात अपशब्द वापरण्यात आले, असा आरोप मेधा सोमैया (Medha Somaiya) यांनी केला आहे. सोबत त्यांचे वकील तसेच भाजपाचे कार्यकर्तेदेखील होते. शिवसेना आणि भाजपाचे वाद पाहता यावेळी पोलीस खबरदारी घेताना दिसून आले. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपात वाक् युद्ध पाहायला मिळत आहे. त्यात संजय राऊत आणि किरीट सोमैया यांच्यात तर तीव्र सामना सुरू आहे. आरोप-प्रत्यारोप रोजच होताना दिसून येत आहेत. आता सर्व कुटुंबासह सोमैयांनी राऊत यांच्याविरोधात तक्रार केली आहे.

Published on: May 09, 2022 06:25 PM