कांदा, अब्दुल सत्तार अन् लाल वादळ; दिवसभरातील चर्चेच्या विषयांवरचा बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
VIDEO | मुंबईत धडकणारं लाल वादळ, कांदा अनुदान अन् अब्दुल सत्ताराचं विधान चर्चेत... बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
नाशिक : अवकाळी पावसाचे संकट तर शेतमालास योग्य बाजारभाव नाही. या अशा परिस्थितीत कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी मात्र शेतकरी आत्महत्या याआधीही होत होत्या, या विधानावरून चांगलेच अडकले आहे. अब्दुल यांच्या वक्तव्याने सरकारची शेतकऱ्यांबद्दलची मानसिकता काय आहे हे दाखवून दिले आहे, अशी टीका विरोधकांनी केली आहे. त्यातच किसान सभेने नाशिक-मुंबई असा लाँग मार्च काढून सरकारला घेरण्याचे काम केले आहे. त्यामुळे आता उद्या धडकणाऱ्या किसान मोर्चाच्या लाल वादळ आंदोलनाला सरकारतर्फे आता कोण सामोरे जाणार असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर किसान सभेने मात्र आपल्या 12 मागण्यांवर ठाम राहून त्यावरून सरकारला घेरणार असल्याचाही निर्धार व्यक्त केलाय… दिवसभरातील या तिनही मुद्द्यावर प्रकाश टाकणारा बघा टिव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट
Published on: Mar 13, 2023 11:36 PM
Latest Videos