ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर ईडीच्या रडारवर, मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होणार?
VIDEO | ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांच्यावर ईडीकडून मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता, मृत कोरोना रूग्णांसाठी बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाल्याची भाजप नेते किरीट सोमय्या यांची तक्रार , बघा स्पेशल रिपोर्ट
मुंबई, ११ ऑगस्ट २०२३ | ठाकरे गटाच्या फायर ब्रँड नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर ईडीकडून गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. बॉडी बॅग खरेदी करताना आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर करण्यात आलाय. त्यामुळे आता किशोरी पेडणेकर यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. किशोरी पेडणेकर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची माहिती आता ईडीने मागवली आहे. ईडीकडून किशोरी पेडणेकर यांच्यावर मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून ईडीने ही माहिती मागविली आहे. कोरोना काळात बॉडी बॅग खरेदी करताना आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप किशोरी पेडणेकर यांच्यावर आहे. मृत कोरोना रूग्णांसाठी बॉडी बॅग खरेदीत घोटाळा झाल्याची तक्रार भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली होती. काय होती ती तक्रार बघा स्पेशल रिपोर्ट…