Cruise Drug Party Case | क्रूज ड्रग्ज पाट्री प्रकरणी किल्ला कोर्टात नेमकं काय घडलं ?
कोर्टात जवळपास साडेतीन ते चार तास युक्तीवाद चालला. या दरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
मुंबई : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह आठही आरोपींना किला कोर्टाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. याआधी कोर्टाने त्यांना 7 ऑक्टोबर म्हणजेच आजपर्यंत एनसीबी कोठडी सुनावली होती. या कोठडीची मुदत आज संपली. त्यानंतर त्यांना आज पुन्हा किला कोर्टात दाखल करण्यात आलं. यावेळी एनसीबीच्या वकिलांनी 11 ऑक्टोबरपर्यंत आरोपींची कोठडी मागितली. कोर्टात जवळपास साडेतीन ते चार तास युक्तीवाद चालला. या दरम्यान कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. कोर्टात युक्तीवादादरम्यान आर्यनच्या वकिलांनी कोर्टात ड्रग्ज पार्टीच्या रात्री नेमकं काय झालं, एनसीबी अधिकाऱ्यांनी काय-काय विचारलं ती सर्व माहिती दिली.