आक्षेपार्ह स्टेस्टस? आज कोल्हापूर बंद; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक
काही तरुणांनी जातीय तेढ निर्माण होणारे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले होते. यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला. संबंधित तरुणांवर कारवाईकरण्याची मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. तर आज हिंदुत्ववादी संघटनेची कोल्हापूर बंदची हाक दिली आहे.
कोल्हापूर : शिवराज्याभिषेक दिनादिवशीच कोल्हापुरात दोन समुदायामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं. काही तरुणांनी जातीय तेढ निर्माण होणारे स्टेटस सोशल मीडियावर ठेवले होते. यामुळे दोन गटात वाद निर्माण झाला. संबंधित तरुणांवर कारवाईकरण्याची मागणी करत हिंदुत्ववादी संघटनांनी शहरातील लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडला. तर आज हिंदुत्ववादी संघटनेची कोल्हापूर बंदची हाक दिली आहे. यानंतर कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी हिंदुत्ववादी संघटनांना बंद मागे घेण्याचे आवाहन केले होते. मात्र हिंदुत्ववादी संघटना बंदवर ठाम आहेत. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न बिघडू नये यासाठी जिल्हा प्रशासनानं जमावबंदीचे आदेश काढले आहेत.
Published on: Jun 07, 2023 09:43 AM
Latest Videos