महानगरपालिकेच्या ढीसाळ कारभाराचा फटका; ऐन उन्हाळ्यात कोल्हापूरकरांच्या घशाला कोरड
काखेत कळसा गावाला वळसा अशी तऱ्हा ही कोल्हापुरकरांची झाली आहे. पंचगंगा नदीत पाणी असूनही शहरातील लोकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे.
कोल्हापूर : कोल्हापूर शहर वासियांच्या प्रश्नांची सोडवणूक कधी होणार हे मात्र अजूनही स्पष्ट होताना दिसत नाही. ना हद्द वाढ, ना रस्त्यांची सुविधा, ना रेल्वेचे प्रश्न आणि ना थेट पाईप लाईन. हे प्रश्न असेच असताना मात्र शहर वासियांची राजकारणी थट्टा करण्यात व्यक्त आहेत. तीन खासदार, तीन ते चार विद्यमान आमदार माजी, आमदार शहरात राहयाला असतानाही हे प्रश्न असेच पडले आहेत. याचा परिणाम हा आत्ता दिसत आहे. काखेत कळसा गावाला वळसा अशी तऱ्हा ही कोल्हापुरकरांची झाली आहे. पंचगंगा नदीत पाणी असूनही शहरातील लोकांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. तर अनेक ठिकाणी महानगरपालिकेच्या ढीसाळ कारभाराचा फटका बसताना दिसत आहे. अनेक भागात अपुरा पाणीपुरवठा आहे. मंगळवार पेठ, शुक्रवार पेठ, शनिवार पेठसह बहुतांशी भागाला टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ महानगरपालिकेवर आली आहे. यामुळे कडाक्याच्या उन्हात महिला आणि लहान मुलांना पाण्यासाठी टँकरच्या रांगेत उभं रहावं लागतं आहे.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..

