Kolhapur Water Supply Off | कोल्हापूरमध्ये दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार – tv9
आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
कोल्हापूर शहरातला पाण्याचा प्रश्न हा मार्गी काही लागताना दिस नाही. थेट पाईप लाईनव्दारे कोल्हापूरकरांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागेल असे वाटतं असतानाच त्याच्या तारखा मात्र पुढेच जात आहेत. दरम्यान सध्याच्या सुरू असणाऱ्या पाईप लाईनमध्ये सतत बिघाड हा होत असतो. यामुळे कोल्हापूर शहरवासियांना पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. यादरम्यान आता पुन्हा एकदा कोल्हापूरमध्ये दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची माहिती मिळत आहे. दुरुस्तीच्या कामांमुळे दोन दिवस पाणी पुरवठा बंद राहणार असल्याचे मनपा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तर पाण्याचा काटकसरीने वापर करा असे आवाहन देखिल मनपा प्रशासनाकडून नागरिकांना करण्यात आलं आहे.
Latest Videos