स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज; 'इतके' उमेदवार रिंगणात उतरवणार

स्वाभिमानी शेतकरी संघटना लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज; ‘इतके’ उमेदवार रिंगणात उतरवणार

| Updated on: Mar 22, 2023 | 2:58 PM

Lokabha Election 2024 : स्वाभिमानी शेतकरी संघटना निवडणुकीच्या तयारीला; हातकणंगलेची जागा लढवणार का? माजी खासदार राजू शेट्टी यांनी याविषयी माहिती दिली आहे. पाहा...

कोल्हापूर : आज गुढीपाडवा म्हणजेच साडेतीन मुहूर्तापैकी एक. याच दिवशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने निवडणुकांबाबत मोठी घोषणा केली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शड्डू ठोकला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले लोकसभा मतदारसंघासह पाच लोकसभा मतदारसंघातील निवडणुका लढवणार आहे, माजी खासदार राजू शेट्टी यांनी ही माहिती दिली आहे. लवकरच उमेदवारांची यादी ही जाहीर करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. आंबा येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या प्रशिक्षण मेळाव्यात हा निर्णय झाला. त्यामुळे येत्या निवडणुकीत स्वाभिमानी पूर्ण ताकदीनिशी निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं दिसत आहे.