कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी खुला, आता मनसोक्त लुटता येणार आनंद

कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी खुला, आता मनसोक्त लुटता येणार आनंद

| Updated on: Jul 30, 2023 | 12:14 PM

VIDEO | कोल्हापुरातील राऊतवाडी धबधब्याचं नयनरम्य ड्रोन कॅमेऱ्यात कैद, बघा नयनरम्य दृश्य

कोल्हापूर, 30 जुलै 2023 | पावसाळा आला की निसर्ग पर्यटकांना खुणावत असतो. राज्यातील असे बरेच ठिकाण आहेत ते पर्यटकांना पावसाळ्यात आकर्षित करत असतात. मात्र राज्यात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पाऊस होत असल्याने अशा ठिकाणी पर्यटकांना सुरक्षिततेच्या दृष्टिकोनात बंदी घालण्यात आली होती. मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने प्रशासनाकडून आनंदाची बातमी देण्यात आली आहे. पावसामुळे बंद केलेला राऊतवाडी धबधबा पर्यटकांसाठी खुला करण्यात आला आहे. राऊतवाडी धबधब्याचं हे विहंगम दृश्य ड्रोन कॅमेऱ्यानं कैद केलंय. १५० फूट उंचीवरून कोसळणारा राऊतवाडी धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधून घेतोय. मुसळधार पावसामुळे कोणतीही दुर्घटना होऊ नये म्हणून हा महाकाय धबधबा पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. मात्र आता पावसाचा जोर ओसरल्याने हा बंदीचा निर्णय मागे घेण्यात आलाय. राऊतवाडी धबधबा हा राधानगरी तालुक्यातील प्रसिद्ध धबधबा आहे. या धबधब्याचा आनंद लुटण्यासाठी हजारो पर्यटक येथे दाखल होत असतात. राऊतवाडी धबधबा कोल्हापूर पासून ५५ किमी अंतरावर आहे. तर राधानगरीपासून फक्त साडेसहा किमी अंतरावर आहे.

Published on: Jul 30, 2023 12:12 PM