‘पण उर्वरित महाराष्ट्राच काय?’ कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या मुद्द्यावरून अशोक चव्हाण यांचा सरकारला सवाल
VIDEO | मराठा समाजाकडे कुणबी असल्याच्या नोंदी असतील त्या मराठा व्यक्तीला कुणबी जात प्रमाणपत्र मिळणार असल्याचा राज्य सरकारने घेतला निर्णय, सरकारच्या या निर्णयावर अशोक चव्हाण नेमकं काय म्हणाले?
नांदेड, ८ सप्टेंबर २०२३ | ‘ज्यांच्याकडे निजाम काळातील महसुली आणि शैक्षणिक नोंदी असतील, त्यांना कुणबी दाखले दिले जातील’, मराठा आरक्षणाबाबत एकनाथ शिंदे यांनी अशी घोषणा केली होती. त्यानंतर जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या मागणीचा विचार करुन शिंदे-फडणवीस सरकारचा अधिकृत जीआर जारी केला. यावर काँग्रेस नेते, माजी मंत्री अशोक चव्हाण यांनी भाष्य केले आहे. ते म्हणाले, मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी राज्य सरकारने सूरु केली आहे. मराठवाड्यात कुणबी म्हणून जुने दाखले आहेत, पण उर्वरित महाराष्ट्राच काय? असा प्रश्न अशोक चव्हाण यांनी उपस्थित केला आहे. शिवाय हा विषय देखील कायदेशीर पेचात अडकण्याची शक्यता आहे. यावर पुन्हा न्यायालयात आव्हान दिलं जावू शकत. तूम्ही म्हणता ना टिकणारं आरक्षण देऊ तर टिकनाणं द्या, असं म्हणच अशोक चव्हाण यांनी खोचक टोलाही लगावला आहे.