Ladki Bahin Yojana : ‘या’ महिलांना आता 1500 नाही तर 800 रूपयांचा हफ्ता येणार, लाडक्या बहिणींनो तुम्ही तर नाही ना यात? बघा…
नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता कमी मिळणार असल्याचे समोर आले आहे. नमो शेतकरी योजनेचा लाभ घेणाऱ्या आठ लाख महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता आता ५०० रुपये मिळणार आहे,
तब्बल आठ लाख लाडक्या बहिणींना आता १५०० रुपयांऐवजी ५०० रुपये मिळणार आहेत. नमो शेतकरी महासंन्मान निधी मिळत असल्याने लाडकी बहिणीच्या हफ्त्यात कपात होणार आहे. आठ लाख महिलांना नमो शेतकरी कार्यक्रमांतर्गत एक हजार रुपयांचा सन्मान निधी देण्यात येतो. दरम्यान, सरकारकडून करण्यात आलेल्या छाननीत आठ लाख महिलांना दोन योजनांचा लाभ मिळत असल्याचे समोर आले आहे. तर दोन सरकारी योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना मिळणाऱ्या हफ्त्यात निधीची कपात होणार आहे.
यानुसार, आता या महिन्यापासून आठ लाख लाडक्या बहिणींना आता महिन्याला १५०० रुपयाऐवजी फक्त ५०० रुपये मिळणार आहे. दरम्यान, आठ लाख लाडक्या बहिणींना नमो शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळत असल्याचं छाननीतून समोर आले आहे. नमो शेतकरी महासन्मान योजनेतून १००० रुपये मिळत असल्याने लाडकी बहिणी योजनेच्या हफ्त्यात कपात होणार आहे. छाननीत अर्ज आढळलेल्या आठ लाख महिलांना या महिन्यापासून लाडकी बहीण योजनेतून फक्त ५०० रुपये मिळणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनेचा खर्च ४६ हजार कोटींहून ३६ हजार कोटी करण्यात आला असल्याची माहितीही समोर आली आहे.