Devendra Fadnavis | अध्यक्षपदासाठी आमची रणनीती नंतर जाहीर करू, देवेंद्र फडणवीस LIVE
जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. त्यांनी निर्णय झाल्यावर आमची रणनिती समोर येईलच, असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलाय.
5 आणि 6 जुलै रोजी होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवडणूक घ्यावी अशी मागणी काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या भाजपनं केली आहे. याच अधिवेशनात विधानसभा अध्यक्षाची निवड होईल आणि विधानसभा अध्यक्ष काँग्रेसचाच होईल, असा दावा बाळासाहेब थोरात यांनी केलाय. दरम्यान, अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला आव्हान दिलं आहे. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते. ‘विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घोषित होऊ द्या. घोषणा झाल्यावर भाजप आपली रणनिती समोर आणेल. पहिल्यांदा राज्य सरकारचा निर्णय समोर येऊ द्या. जोपर्यंत त्यांचा अध्यक्षपदाचा निर्णय होत नाही. तोपर्यंत आम्ही कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही. त्यांनी निर्णय झाल्यावर आमची रणनिती समोर येईलच’, असा इशारा फडणवीस यांनी ठाकरे सरकारला दिलाय.
Latest Videos