‘केसीआर यांचा सोलापूर, पंढरपूर दौरा म्हणजे फक्त दिखावा’; दानवे यांची सडकून टीका
सोलापूर, पंढरपूर दौरा झाला. मात्र त्याच्या आधी त्यांची जोरदार मटन पार्टी झाली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील केसीआर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.
औरंगाबाद : महाराष्ट्रात पक्षविस्तारासाठी भारत राष्ट्र समिती पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी चांगलेच प्रयत्न सुरू केले आहेत. याचपार्श्वभूमिवर त्यांचा सोलापूर, पंढरपूर दौरा झाला. मात्र त्याच्या आधी त्यांची जोरदार मटन पार्टी झाली. यावरून राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी टीका केली होती. त्यांच्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते विधान परिषद विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी देखील केसीआर यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. त्यांनी केसीआर यांचा सोलापूर, पंढरपूर दौरा म्हणजे फक्त दिखावा असल्याचं म्हटलं आहे. तर माऊलींच दर्शन हे सुद्धा त्यांची खोटी भक्ती असल्याची टीका त्यांनी केली आहे. केसीआर यांच्यावर टीका करताना त्यांनी सोलापूरला जाताना लातूरमध्ये केसीआर यांनी शंभर बोकडे आणि पाचशे कोंबड्या फस्त केल्या. कोंबड्या आणि बकरी कापून हे माऊलींच्या दर्शनाला चालले. जो वारकारी शाहाकाहारी आहे जो शेकडो किलोमीटर पायी जातो. तेथे हे अशा पद्धतीने जात शक्तीप्रदर्शन करतात. त्यामुळे यांची खोटी भक्ती आहे. तर त्यांनी जर त्याचं लक्ष महाराष्ट्रात घातलं तर त्यांच्या पायाखालून तेलंगणा जाईल असेही ते म्हणालेत.
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी

