Vijay Wadettiwar : विजय वडेट्टीवार यांनी लगावला सुधीर मुनगंटीवार यांना खोचक टोला; म्हणाले, चंद्रपूरचा भाऊ सध्या…
VIDEO | विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे. पालकमंत्री असलेले भाऊ लोकसभा उमेदवारीबाबत गोंधळून गेल्याची टीका त्यांनी केली. चंद्रपूरातील घुग्गुस येथील सत्कार कार्यक्रमाला वडेट्टीवार यांनी हजेरी लावली असता केली फटकेबाजी
चंद्रपूर, २३ ऑक्टोबर २०२३ | विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना टोला लगावला आहे. पालकमंत्री असलेले भाऊ लोकसभा उमेदवारीबाबत गोंधळून गेल्याची टीका त्यांनी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र मुनगंटीवार यांना दिल्लीत पाठविण्याचा निश्चय केल्याचे विधान केले. मुनगंटीवार यांनी वेगवेगळ्या विधानसभा क्षेत्रात आपल्या माणसांच्या तिकिटासाठी भोजनावळी सुरू केल्याचे मत विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले. चंद्रपूर येथे बोलत असताना विजय वडेट्टीवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावर सडकून टीका करत खोचक टोला लगावला आहे. इतकेच नाही तर वडेट्टीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधल्याचे पाहायला मिळाले. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस येथील एका सत्कार कार्यक्रमाला विजय वडेट्टीवार यांनी हजेरी लावली असता विजय वडेट्टीवार यांनी यावेळी विरोधकांवर तुफान फटकेबाजी केली.