फ्लाइंग किसच्या मुद्द्यावरून राहुल गांधी यांना घेरण्याचा भाजपचा प्रयत्न; वडेट्टीवार म्हणतात, ‘महिलांना पुढे करून…’
यावेळी त्यांच्याकडून फ्लाइंग किस गेल्याचा आरोप केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केला. तर त्यांनी याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली. यावरून सध्या भाजप चांगलीच आक्रमक झाली असून आज महाराष्ट्रात यावरून आंदोलन केलं जाणार आहे.
मुंबई, 10 ऑगस्ट 2023 । बुधवारी लोकसभेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी संसदेत जोरदार भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजपचा खरपूस समाचार घेत ते भारत मातेचे हत्यारे असल्याची घणाघाती टीका केली. यावेळी त्यांच्याकडून फ्लाइंग किस गेल्याचा आरोप केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी केला. तर त्यांनी याबाबत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार दाखल केली. यावरून सध्या भाजप चांगलीच आक्रमक झाली असून आज महाराष्ट्रात यावरून आंदोलन केलं जाणार आहे. याचदरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं ही भाजच्या केंद्र सरकारकडे नाहीत. त्यामुळेच त्यांना बदनामी करण्याचा प्रयत्न होतोय अशी नुकताच विधानसभा विरोधी पक्षनेता म्हणून नियुक्त झालेल्या विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. ते नागपूर प्रेस क्लबमध्ये बोलत होते. तर यावेळी राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांवरून लक्ष हटवण्यासाठीच भाजपच्या महिला खासदारांनी तसं केल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केलाय. महिलांना पुढे करून राहुल गांधींना बदनाम करण्याचा प्रयत्न भाजप करत आहे. पण देशातील जनता त्यांना चोख प्रत्युत्तर देईल असे देखील वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.