बुल्डोडर राज नही चलेगा...धारावीत 'मशिदी'वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली

बुल्डोडर राज नही चलेगा…धारावीत ‘मशिदी’वरुन तणाव, BMC ची गाडी फोडली

| Updated on: Sep 22, 2024 | 10:44 AM

मुंबईतील धारावी येथील मशिदीवरील अनधिकृत बांधकाम हटवण्यासाठी महापालिकेची गाडी पोहोचली मात्र जमावाकडून गाडीची तोडफोड कऱण्यात आली. यावरूनच आता राजकीय वाचावरण तापलं आहे.

अनधिकृत मशिदीचा भाग पाडण्यासाठी महापालिकेचं पथक मुंबईतील धारावी येथे पोहोचलं आणि तणाव निर्माण झाला. जमावाने महापालिकेची गाडी फोडली आणि पाहता-पाहता मुस्लिमांचा मोठा परिसरक सुभानी मशिदीच्या परिसरात पोहोचला. महापालिकेचे कर्मचारी मशिदीचं अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी पुढे जाऊ लागले असताना नागरिकांनी रस्त्यातच ठिय्या मांडला. अखेर सुभानी मशिदीच्या ट्रस्टीनी चार ते पाच दिवसात आम्हीच अनधिकृत बांधकाम तोडण्याचं लेखी अश्वासन दिलं आणि महापालिका प्रशासनाने विनंती मान्य केली. त्यानंतर महापालिकेचे कर्माचारी आणि गाड्या माघारी फिरल्या. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, मशिदीच्या ट्रस्टीनी लेखी दिल्याप्रमाणे ते पाच ते सहा दिवसात स्वतःहून बांधकाम तोडतील. मात्र स्थानिकांनी आता बुलडोझर राज नही चलेंगा म्हणत स्थगितीसाठी कोर्टात जाणार असल्याचे म्हटलंय. तर ज्या पद्धतीने महापालिकेची गाडी फोडण्यात आली आणि अनधिकृत बांधकाम तोडण्यापासून अडवण्यात आलं, यावरून नितेश राणेंनी जोरदार टीका केली.

Published on: Sep 22, 2024 10:44 AM