लोकसभा अन् विधानसभा निवडणुका एकत्रच होणार? निवडणूक आयोगाची लगबग

| Updated on: May 29, 2023 | 11:26 AM

VIDEO | लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होणार! सामना वृत्तपत्रातून नेमका काय केला दावा?

मुंबई : आगामी लोकसभा निवडणूक या २०२४ मध्ये होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगाची लगबग सुरू आहे. ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचे दौरे आणि बैठका सुरू आहेत, ते पाहता राज्य विधानसभेच्या निवडणुकीची घोषणा होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. म्हणजे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्र होण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोग निवडणुकीच्या कामाला लागल्याचं वृत्त दैनिक ‘सामना’त देण्यात आलं आहे. या वृत्तानुसार निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना निवडणुकीची तयारी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या सूचनेनुसार राज्य निवडणूक आयोग कामाला लागलंय. कामाची गती पाहता लोकसभा, विधानसभा निवडणुका एकत्रच घेतल्या जातील, असे संकेत आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या जिल्ह्यांमध्ये बैठका सुरू तर निवडणूक अधिकाऱ्यांना इतर कोणतेही काम देऊ नका, असे आदेश देण्यात आलेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रत्येक राज्यातील मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत, सामनातून लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होणार असल्याच्या दावा सामनातून करण्यात आला आहे.

Published on: May 29, 2023 11:18 AM
गौतमी पाटीलच्या आडनावाच्या वादानंतर संभाजीराजे छत्रपतींचा पाठिंबा; म्हणाले, “महिलांना स्वातंत्र्य…”
‘ये थांबरे, अगाऊपणा नको… अशा लोकांमुळे पार्टीचा सत्यानाश झालाय’, रामदास आठवले भर सभेत भडकले