Special Report | ‘शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य हेच खरे हिंदूराष्ट्र?’ सरसंघचालक भागवत यांचे वक्तव्य
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच हिंदवी स्वराज्याबद्दल वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलेलं आहे. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं.
मुंबई : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. यात भाजपकडून निवडणूका आल्या की हिंदू कार्ड हे काढले जात. त्यांच्यापाठोपाठ सर्वच राजकीय पक्ष हे सुद्धा हिंदूकार्ड काढतातच. मात्र यावेळी?’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याच हिंदवी स्वराज्याबद्दल वक्तव्य केलं आहे. ज्यामुळे सध्या राजकारण चांगलंच तापलेलं आहे. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गाच्या समारोप कार्यक्रमात त्यांनी हे विधान केलं. छत्रपती शिवाजी महाराज हे काळाहून पुढचा विचार करायचे. या देशाबद्दल आपुलकीचे नाते ठेवणाऱ्यांना त्यांनी सुरक्षित केले. तेच तर हिंदवी स्वराज्य आहे आणि त्यालाच आम्ही हिंदू राष्ट्र म्हणतो असे सरसंघचालक म्हणाले. त्यावरून आता वार पलटवार होताना दिसत आहेत. त्याच्यावरच हा स्पेशल रिपोर्ट