आरएसएस विरोधातील आक्षेपाहार्य वक्तव्य? अख्तर यांची याचिका फेटाळली
जावेद अख्तर 31 मार्च रोजी पुढच्या तारखेला मुलुंड महानगर दंडाधिकारी कोर्टात हजर होणार का? किंवा काही इतर कायदेशीर मार्ग पत्करणार हे पहावे लागणार आहे.
मुंबई : प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांना मुंबई सत्र न्यायालयाने दिलासा दिला नाही. अख्तर यांनी आरएसएस विरोधातील आक्षेपाहार्य वक्तव्य केलं होतं. त्याप्रकरणी एड संतोष दुबे यांनी मुलुंड महानगर दंडाधिकारी कोर्टात याचिका दाखल केली होती. तर मुलुंड महानगर दंडाधिकारी न्यायालयानं त्यांना कोर्टात हजर राहण्यासाठी समन्स जारी केला होता. मात्र मुलुंड कोर्टाने जारी केलेल्या समन्स कायद्याला धरून नाही असं म्हणत तो रद्द करण्यासाठी जावेद अख्तर यांनी मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती.
मात्र अख्तर यांच्या याचिकेवर मुंबई सत्र न्यायालयाने निर्णय देत त्यांची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे जावेद अख्तर 31 मार्च रोजी पुढच्या तारखेला मुलुंड महानगर दंडाधिकारी कोर्टात हजर होणार का? किंवा काही इतर कायदेशीर मार्ग पत्करणार हे पहावे लागणार आहे.
Published on: Mar 21, 2023 07:36 AM
Latest Videos