बारामती लोकसभेमध्ये नणंद विरूद्ध भावजय यांच्यात रंगणार सामना?
बारामती लोकसभेमध्ये नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगताना? बारामतीमध्ये गेल्या निकालाची आकडेवारी काय होती? सध्या नेमका किती बदल झालाय? बारामती लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता निश्चित झालीये.
मुंबई, १९ फेब्रुवारी २०२४ : बारामती लोकसभेमध्ये नणंद विरूद्ध भावजय असा सामना रंगताना दिसणार असण्याची शक्यता दिवसेंदिवस वाढत आहे. बारामती लोकसभेतून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी लढावं, यासाठी कार्यकर्ते आग्रही असल्याची प्रतिक्रिया स्वतः सुनील तटकरे यांनी दिली आहे. बारामतीमध्ये गेल्या निकालाची आकडेवारी काय होती? सध्या नेमका किती बदल झालाय? बारामती लोकसभेच्या इतिहासात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार असा सामना रंगण्याची शक्यता निश्चित झालीये. बारामती लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे तर महायुतीच्या उमेदवार म्हणून अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उतरवण्याची चिन्ह आहेत. एकीकडे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाचा रथ फिरतोय. तर दुसरीकडे सुप्रिया सुळे यांचा.. त्यामुळे आतापासूनच दोन्ही बाजूने जोरदार तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट