VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 PM | 30 May 2022

| Updated on: May 30, 2022 | 1:17 PM

अकरा वर्ष मुलीवर होणारा अत्याचार ऐकताच पुंडलिकनगर पोलीस कर्मचारी स्तब्ध झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी बापाने पुन्हा अत्याचार केल्याने मुलीने घरातून जाण्याचा निर्णय घेतला. सतरा वर्षीय तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करायला सुरूवात केली. परभणी जिल्ह्यात मुलगी असल्याची माहिती औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलिसांना माहिती मिळाली. 

औरंगाबादमध्ये (Aurangabad) पोटच्या मुलीवर बापाने केला तब्बल अकरा वर्षे अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. अकरा वर्षे अत्याचार करणारा मनोविकृत बाप पोलिसांनी (Aurangabad Police) ताब्यात घेतला आहे. बालवयात होणाऱ्या अत्याचाराला कंटाळून मुलीने घर सोडले असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले आहे. वारंवार बापाकडून अत्याचार होत असल्याने अल्पवयीन तरूणी घर सोडून अंबेजोगाईला (Ambajogai) गेली होती. अकरा वर्ष मुलीवर होणारा अत्याचार ऐकताच पुंडलिकनगर पोलीस कर्मचारी स्तब्ध झाले आहेत. दीड महिन्यापूर्वी बापाने पुन्हा अत्याचार केल्याने मुलीने घरातून जाण्याचा निर्णय घेतला. सतरा वर्षीय तरूणी बेपत्ता असल्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. त्यानुसार पोलिसांनी चौकशी करायला सुरूवात केली. परभणी जिल्ह्यात मुलगी असल्याची माहिती औरंगाबादमधील मुकुंदवाडी पोलिसांना माहिती मिळाली.

Published on: May 30, 2022 01:17 PM
Udayan Raje Bhosale यांनी पुस्तकं विकणाऱ्या मुलीकडून सगळे पुस्तके विकत घेत दिलदारपणा दाखवला
VIDEO : Mumbai | Navneet Ravi Rana यांच्या घरी ऑडिट करण्यासाठी महापालिकेची टीम दाखल