MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 27 June 2021
संजीव पालांडे यांची बाजू वकील शेखर जगताप तर कुंदन शिंदे यांची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर यांनी मांडली. तर ईडीच्यावतीने सुनील गोंसावलीस यांनी युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने दोघांना 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी दिली
ईडीने अटकेत असलेले संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे यांचा रिमांड मिळावा यासाठी त्यांना आज कोर्टात हजर केलं. मुंबई सेशन कोर्टातील न्यायमूर्ती डॉ यु. एल. मोरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. आरोपी संजीव पालांडे यांची बाजू वकील शेखर जगताप तर कुंदन शिंदे यांची बाजू वकील अभिजीत सावंत आणि मेहूल ठक्कर यांनी मांडली. तर ईडीच्यावतीने सुनील गोंसावलीस यांनी युक्तिवाद केला. यावेळी कोर्टाने दोघांना 1 जुलैपर्यंत ईडी कोठडी दिली
ईडीने शनिवारी (25 जून) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर काल दुपारी अनिल देशमुख यांचे खाजगी सचिव संजीव पालांडे आणि खाजगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यांची 10 तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दोघांना अटक करण्यात आली. यानंतर अनिल देशमुख यांना तात्काळ चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहीले नाहीत. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितली. अनिल देशमुख हे चौकशीला हजर न झाल्याने आता ईडीचे अधिकारी अनिल देशमुख यांना दुसरं समन्स पाठवण्याच्या तयारीत आहेत. येत्या एक-दोन दिवसात हे समन्स पाठवलं जाईल आणि पुढच्या आठवड्यात त्यांना चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यता आहे