शिंदे गट ही उच्च न्यायालयात, दाखल केले कॅवेट यासह पहा इतर बातम्या महाफास्ट न्यूज 100 मध्ये
शिंदे गट ही उच्च न्यायालयात गेले आहे. त्यांनी आमची बाजू ऐकल्याशिवाय ठाकरेंच्या याचिकेवर निर्णय देवू नका असा कॅवेट शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलं आहे.
शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठावल्याने उद्धव ठाकरे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तर निवडणूक आयोगाविरोधात उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. तर ठाकरे यांनी उच्च न्यायालयात धाव घेताच. शिंदे गट ही उच्च न्यायालयात गेले आहे. त्यांनी आमची बाजू ऐकल्याशिवाय ठाकरेंच्या याचिकेवर निर्णय देवू नका असा कॅवेट शिंदे गटाकडून दाखल करण्यात आलं आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या नावाचे 3 पर्याय दिले आहे. शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना बाळासाहेबांची आणि बाळासाहेवांची शिवसेना अशा नावांचे पर्याय आयोगाला शिंदे गटाने दिले आहेत. तर शिंदे गटाने निवडणूक आयोगाला पक्षाच्या नव्या चिन्हासाठी गदा, त्रिशूळ आणि उगवत्या सुर्याचा पर्याय दिला आहे. तसेच खासदार विनायक राऊत यांनी शिंदे गटाला उत्तर दिलं आहे. त्यांनी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे ब्रँड कोणी पुसू शकत नाही असे म्हटलं आहे. तर मुंबईत अयोध्याचे महंत यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच राज ठाकरे यांना अयोध्या भेटीचं नियंत्रण ही देण्यात आलं आहे. उद्धव ठाकरे गटाच्या अंधारे यांच्यावर भाजपच्या केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी टीका केली आहे. तसेच मोदींवर टीका केल्यानं प्रसिद्धी मिळते असे त्या म्हणाल्या. तसेच सेट परिक्षेची तारिख लवकरच जाहीर होणार आहे. याबाबत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने स्पष्टीकरण दिलं आहे.