ही मशाल अन्यायसोबत गद्दारीला जाळणारी असेल असे उद्धव ठाकरे का म्हणाले, यासह इतर बातम्यांचा अढावा घ्या महाफास्ट न्यूज 100 मध्ये
माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी शिवसेना नाव जाने हे मनाला वेदना देणारे, क्लेशदायक असल्याचे म्हटलं आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाला मशाल हे चिन्ह काल निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. त्यानंतर काही वेळातच हे चिन्ह राज्याच्या काणाकोपऱ्यात पोहचले. तर आज मुंबईतील सांताक्रुझ येथील शिवसैनिकांनी सांताक्रुझ ते शिवाजी पार्क अशी मशाल रॅली काढली. तसेच मातोश्रीवर जात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच तसेच अंधेरी पोटनिवडणूक मशाल या चिन्हाने जिंकूण दाखवू असाही विश्वास कार्यकर्त्यांनी बोलून दाखवला. याचवेळी ही मशाल अन्यायसोबत गद्दारीला जाळणारी असेल. तर ही मशाल हाती घेण्यास कचुराई नको असे वक्तव्य उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. याचदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनी शिंदे गटावर निशाना साधला आहे. त्यांनी बाळासाहेंबाच्या ऐवजी मोदी, शाहांच्या नावाने चिन्ह मागा, तुम्हाला ताकद दिसेल असा टोला शिंदे गटाला लगावला आहे. तर माजी मंत्री आणि आमदार छगन भुजबळ यांनी शिवसेना नाव जाने हे मनाला वेदना देणारे, क्लेशदायक असल्याचे म्हटलं आहे. तर मिरभाईंदर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्रमात काळे कपडे घालून येण्यास मनाई करण्यात आली होती. यावेळी काळे कपडे, रूमाल आणि पेन घेऊन येणाऱ्यांना कार्यक्रमास जाण्यास मनाई करण्यात आली.