मराठा आरक्षणासाठी अनोखा संकल्प, आरक्षण जाहीर होताच केस कापले अन्...

मराठा आरक्षणासाठी अनोखा संकल्प, आरक्षण जाहीर होताच केस कापले अन्…

| Updated on: Jan 31, 2024 | 5:32 PM

परभणीतील मराठा बांधवांनी एक अनोखा संकल्प केल्याचे पाहायला मिळाले. परभणी गावातील महाराज नितीन गोवळगावकर यांनी मराठा आरक्षण भेटत नाही तोपर्यंत केस न कापण्याचा संकल्प केला होता. त्यांनी दोन ते तीन वर्ष केसांना कात्री लावली नव्हती परंतु आरक्षण जाहीर होताच त्यांनी केस कापले.

परभणी, ३१ जानेवारी २०२४ : मराठा आंदोलनासाठी मराठयांचा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला उपोषण देखील केले आणि अखेर मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश मिळाले. सोबतच अनेक मराठा बांधवांनी जरांगे पाटील यांना सहकार्य केले तर परभणीतील मराठा बांधवांनी एक अनोखा संकल्प केल्याचे पाहायला मिळाले. परभणी गावातील महाराज नितीन गोवळगावकर यांनी मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत केस न कापण्याचा संकल्प केला होता. त्यांनी दोन ते तीन वर्ष केसांना कात्री लावली नव्हती परंतु आरक्षण जाहीर होताच त्यांनी केस कापले. नितीन गोवळगावकर यांनी सांगितले की अनेकजण मराठा आरक्षण मिळवण्यासाठी कोणी एक मराठा लाख मराठा अशा घोषणा दिल्या. तर कोणी स्वत:वर पेट्रोल ओतून आत्महत्या केली परंतू मी थोडा वेगळा मार्ग निवडून अशी जनजागृती केली की आत्महत्या करू नका किंवा बलिदान देऊ नका आरक्षण तर मिळणारंच आहे ,म्हणून मी एक नवा संकल्प करत केस न कापण्याचा निर्णय घेतला होता. आज मराठा आरक्षणाचे समन्वयक किशोर राणे आणि मराठा क्रांती मोर्चाचे उपोषण करणारे गजानन भोगदळ यांच्या उपस्थितीमध्ये केस कापून हा संकल्प पूर्ण करत असल्याचे त्यांनी म्हटले.

Published on: Jan 31, 2024 05:32 PM