Chinchwad Election Result | तिरंगी लढतीत अश्विनी जगताप यांनी मारली बाजी

| Updated on: Mar 02, 2023 | 6:50 PM

चिंचवडमधून भाजपच्या उमेदवार ( BJP) अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap Victory ) यांनी मोठा विजय मिळवला आहे. तिरंगी लढतीत त्यांनी बाजी मारली आहे.

Chinchwad Bypoll Result | चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप ( Ashwini Jagtap ) यांनी बाजी मारली आहे.  दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली होती. अश्विनी जगताप हा सुरुवातीपासूनच आघाडीवर होत्या. त्यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार नाना काटे यांचा पराभव केला आहे. अश्विनी जगताप यांचा ३६,०९१ मतांनी मोठा विजय झालाय. त्यांना एकूण १ लाख ३५ हजार ४३४ मतं मिळाली. महाविकासआघाडीचे उमेदवार नाना काटे यांना ९९ हजार ३४३ मतं मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर नेते राहुल कलाटे यांना ४४ हजार ८२ मतं मिळाली आहेत.

Published on: Mar 02, 2023 06:50 PM
रविंद्र धंगेकर यांच्या विजयाबद्दल बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘मराठी माणूस विकला जात नाही तर…’
चिंचवड पोटनिवडणूक जिंकल्यानंतर अश्विनी जगताप ढसाढसा रडल्या अन्…, बघा व्हिडीओ