Maharashtra Cabinet : अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणतं खातं?

Maharashtra Cabinet : अखेर महायुती सरकारचं खातेवाटप जाहीर, फडणवीस-दादा अन् शिंदेंच्या वाटेला कोणतं खातं?

| Updated on: Dec 22, 2024 | 12:40 PM

महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता. मात्र सरकार आल्यानंतर 26 दिवस उलटून गेल्यानतंर महायुतीचं खातेवाटप कधी जाहीर होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधीच 15 डिसेंबर रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला होता. त्यावेळी महायुती सरकारच्या 39 मंत्र्यांनी शपथ घेतली होती, त्यामध्ये 33 कॅबिनेट तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश होता. मात्र सरकार आल्यानंतर 26 दिवस उलटून गेल्यानतंर महायुतीचं खातेवाटप कधी जाहीर होणार? याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. अशातच काल राज्य मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे. यामध्ये गृहमंत्रालय हे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असल्याचे पाहायला मिळाले तर एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास व गृह निर्माण मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

कोणाला कोणतं खातं?

देवेंद्र फडणवीस – गृह
अजित पवार – अर्थ
एकनाथ शिंदे – नगर विकास, गृह निर्माण
चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
हसन मुश्रीफ – वैद्यकिय शिक्षण
चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
गणेश नाईक – वन मंत्री
राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा
पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
गुलाबराव पाटील – पाणी पुरवठा
दादा भुसे – शालेय शिक्षण
गिरीश महाजन – जलसंधारण (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
संजय राठोड – मृद व जलसंधारण
धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
मंगल प्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
जयकुमार रावल – विपणन, शिष्टाचार
अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकरण
अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
आशिष शेलार – माहिती तंत्रज्ञान, सांस्कृतिक
शंभुराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
माणिकराव कोकाटे – कृषी
दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
संजय सावकारे – कापड
संजय शिरसाट – सामाजिक न्याय
प्रताप सरनाईक – वाहतूक
भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
आकाश फुंडकर – कामगार
बाबासाहेब पाटील – सहकार
प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण

राज्यमंत्री (State Ministers )

माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
योगेश कदम – गृहराज्य शहर
पंकज भोयर – गृहनिर्माण

Published on: Dec 22, 2024 12:19 PM