Maratha Reservation Protest | जालन्यातील लाठीचार्जच्या घटनेवर मुख्यमंत्र्यांची एकनाथ शिंदे म्हणाले, ‘दोषी ठरणाऱ्यांवर…’
VIDEO | जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्ज घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले मुख्यमंत्री बघा...
जालना, १ सप्टेंबर २०२३ | जालन्यात मराठा आंदोलकांवर करण्यात आलेला पोलिसांकडून लाठीचार्ज या घटनेमुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाष्य केले आहे. ‘मराठा समाजाच्या आरक्षणावर सरकारची स्पष्ट भूमिका आहे. जालन्यात घडलेला प्रकार दुर्देवी प्रकार आहे. सरकार याची सखोल चौकशी करेल आणि दोषी ठरणाऱ्यांवर कारवाई केली जाईल’, असे म्हणत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जालन्यात मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ते असेही म्हणाले की,“मी स्वत: उपोषणकर्त्याबरोबर बोललो होतो. मी अधिकाऱ्यांनाही बोललो होतो. पोलीस एस पी आणि कलेक्टरशी माझं बोलणं झालं. मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करणं गरजेचं होतं. त्यांनी सांगितलं की, जरांगे पाटील यांना रुग्णालयात नेणं जरुरीचं होतं. त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न सुरु होता. पण त्यावेळी दगडफेकीची दुर्देवी घटना घडली”