महाराष्ट्राची चिंता वाढली! 'या' जिल्ह्यात सापडला कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचा रूग्ण

महाराष्ट्राची चिंता वाढली! ‘या’ जिल्ह्यात सापडला कोरोनाच्या नव्या JN1 व्हेरियंटचा रूग्ण

| Updated on: Dec 21, 2023 | 2:30 PM

डिसेंबर महिन्यापासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर येथे कोरोनाच्या नव्या JN व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशाचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. अशातच महाराष्ट्रातही या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केल्याने खळबळ उडाली

सिंधुदुर्ग, २१ डिसेंबर २०२३ : डिसेंबर महिन्यापासून अमेरिका, चीन आणि सिंगापूर येथे कोरोनाच्या नव्या JN व्हेरियंटच्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे देशाचं टेन्शन पुन्हा वाढलं आहे. अशातच महाराष्ट्रातही या नव्या व्हेरिएंटने शिरकाव केल्याने खळबळ उडाली आहे. सिंधुदुर्गात सापडला कोरोनाच्या नव्या JN व्हेरियंटचा रुग्ण आढळून आला आहे. यानंतर प्रशासनाने गंभीर पाऊलं उचलण्यास सुरूवात केलीये. राज्य सरकारकडून सर्व रूग्णालयांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. या कोरोना व्हेरियंटचा पहिला रुग्ण केरळमध्ये सापडला आहे. विशेष म्हणजे कोरोनाचा पहिला रुग्णही केरळमध्ये मिळाला होता. महाराष्ट्रात नवीन व्हेरियंट दाखल झाला आहे. सिंधुदुर्गात ‘जेएन1’ च्या बाधित रूग्णाची नोंद करण्यात आली आहे. तसेच पुणे, मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.

Published on: Dec 21, 2023 02:30 PM