Nagpur | पत्नीचे हात-पाय बांधून शारीरीक संबंधांची पतीची बळजबरी
पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा नागपुरातील कोर्टाने (Nagpur Court) दिला आहे.
पत्नीची इच्छा नसताना हात-पाय बांधून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणे, हे क्रौर्यच आहे, असा निर्वाळा नागपुरातील कोर्टाने (Nagpur Court) दिला आहे. विवाहितेच्या घटस्फोट (Divorce) अर्जाला न्यायालयाने संमती दिली. 22 वर्षीय विवाहितेने घटस्फोटासाठी कौटुंबिक न्यायालयात अर्ज दाखल केला होता. पतीला दारुचे व्यसन असून सेक्स करण्यास नकार दिल्यावर तो बळजबरी करायचा, असा आरोप पीडितेने केला होता. हात-पाय बांधून नवरा आपल्याला शारीरिक संबंध (Physical Assault) ठेवायला भाग पाडायचा, तसेच आरडाओरडा करु नये, म्हणून तोंडात कापडाचा बोळाही कोंबायचा, असा दावा पीडित तरुणीने अर्जात केला होता. त्यानंतर विवाहितेच्या घटस्फोट अर्जाला संमती देत न्यायालयाने तिला दिलासा दिला आहे.
भाजपात इनकमिंग सुरूच, 22 नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांचा पक्षात प्रवेश
बाबरच्या नावाने मशीद बांधली तर कारसेवक तिथे जातील अन्... राणांचा इशारा
BMC निवडणुकीसाठी मनसे अॅक्टिव्ह...राज ठाकरेंच्या मनसेची मोर्चेबांधणी
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात भाजपची रणनीती, शिंदे सेना-BJP समान जागा लढणार

