CCTV | Vasai मध्ये बाईकस्वाराला अडवून नशेखोरांची दादागिरी; बेदम मारहाण, दुचाकीही फोडली

| Updated on: Mar 27, 2022 | 11:02 AM

वसईतील चुळणा रोड गोकुळ नगरी फेज दोन परिसरात शनिवारी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास बाईकस्वार तरुणाला मारहाण झाल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.

वसई : मुंबईजवळच्या वसई शहरात (Vasai Crime) नशेच्या आहारी गेलेल्या तरुणांची दादागिरी दिवसागणिक वाढत चालली आहे. वसईतील चुळणा परिसरात बाईकस्वार तरुणाला अडवून 6 ते 7 जणांनी लाथाबुक्क्या आणि दगडाने बेदम मारहाण (Youth beaten up) केल्याचा आरोप आहे. शनिवारी (काल) रात्री 7 ते 8 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. दुचाकीस्वार तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याची बाईकही पूर्णपणे तोडून टाकण्यात आली आहे. वसईतील चुळणा रोड गोकुळ नगरी फेज दोन परिसरात शनिवारी रात्री 7:30 वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडल्याचं उघडकीस आलं आहे.

आध्र प्रदेशमध्ये बसचा भीषण अपघात, 40 प्रवासी जखमी
औरंगाबादचे पोलीस अधीक्षक निमित्त गोयल Kachha Badam गाण्यावर थिरकले