लेकरासह पत्नीचे प्राण वाचवूनच जीव सोडला, पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात बुडून पित्याचा मृत्यू

| Updated on: Mar 27, 2022 | 11:43 AM

पलिकडे जात असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि नदीपात्रामध्ये गाळ असल्यामुळे तो यात रुतला. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने पत्नी आणि लहान मुलाला दूर ढकलून देत त्यांचे प्राण वाचवले

पिंपरी चिंचवड : पवना धरणाच्या बॅकवॉटर (Pawna Backwater) परिसरात बुडून (Drown Death) एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. राम लक्ष्मण पवार असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पुणे जिल्ह्यातील (Pune) मावळ तालुक्यात हा प्रकार घडला. पलिकडच्या बाजूला जात असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे आणि नदी पात्रामध्ये गाळ असल्यामुळे हा अपघात घडल्याची माहिती आहे. मयत पिता नदी पात्रातील गाळात रुतला होता. मात्र स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याने पत्नी आणि लहान मुलाला दूर ढकलून दिलं आणि त्यांचे जीव वाचवले, त्यानंतर त्याने स्वतःचे प्राण सोडले. या घटनेने सर्वत्र एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.

पवना धरणाच्या बॅक वॉटर परिसरात एक व्यक्ती बुडाल्याची माहिती मिळताच तात्काळ वन्यजीव रक्षक मावळ आणि शिवदुर्ग रेस्क्यू टीम लोणावळा यांच्या टीमने शोध सुरु केला. मात्र काही तासाच्या अंतराने राम पवार यांचा मृतदेह सापडला.

Yashwant Jadhav यांच्याकडून ‘मातोश्री’ला 2 कोटी? जाधव म्हणतात, ती तर माझी आई!
‘Mehbuba Mufti कधीकाळी BJP ची मैत्रीण होती, त्याच वेळी काश्मिरी पंडितांवर हल्ले : संजय राऊत