बारावीची परीक्षा द्यायला जेलबाहेर आला आणि खून केला!

बारावीची परीक्षा द्यायला जेलबाहेर आला आणि खून केला!

| Updated on: Mar 24, 2022 | 1:27 PM

सांगलीतील रोहन नाईक हत्या प्रकरणात (Rohan Naik Murder Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारावीची परीक्षा देण्याच्या बहाण्याने आरोपी जामिनावर बाहेर आला होता, यावेळी त्याने खून केल्याचं उघडकीस आलं आहे.

सांगली : सांगलीतील रोहन नाईक हत्या प्रकरणात (Rohan Naik Murder Case) धक्कादायक माहिती समोर आली आहे. बारावीची परीक्षा देण्याच्या बहाण्याने आरोपी जामिनावर बाहेर आला होता, यावेळी त्याने खून केल्याचं उघडकीस आलं आहे. खून प्रकरणातील मुख्य संशयित आरोपीबद्दलची माहिती उघड झाली आहे. मंगळवारी संध्याकाळी सांगली स्टॅंडकडे (Sangli Crime) जाणाऱ्या रोडवर रोहन नाईकचा खून झाला होता. या हत्या प्रकरणी दोघे जण अटकेत असून मुख्य संशयिताचा अद्याप शोध सुरु आहे. संबंधित आरोपी कारागृहात होता, मात्र बारावीची परीक्षा देण्याच्या निमित्ताने जामिनावर जेलबाहेर आला होता.

Published on: Mar 24, 2022 01:25 PM