अजित पवार यांचा डेंग्यू गेला पण राजकीय 'ताप' कायम? अजितदादांच्या डेंग्यूवर रामदास कदम यांनाच शंका?

अजित पवार यांचा डेंग्यू गेला पण राजकीय ‘ताप’ कायम? अजितदादांच्या डेंग्यूवर रामदास कदम यांनाच शंका?

| Updated on: Nov 16, 2023 | 12:52 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्या वादावर पडदा पडलाय. मात्र त्याचवेळी रामदास कदमांनी अजित पवार यांच्या डेंग्यूवर विधान करून अजित पवार गटाला डिवचलंय. आता अजित पवार यांचा डेंग्यू बरा झाला आहे. असे असले तरी त्यावरून राजकीय ताप कायम

मुंबई, १६ नोव्हेंबर २०२३ | अजित पवार यांना गेल्या काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. मात्र आता अजित पवार यांचा डेंग्यू बरा झाला आहे. असे असले तरी त्यावरून राजकीय ताप कायम आहे. विरोधकांसह आता सत्ताधाऱ्यांनी देखील अजित पवार यांच्या डेंग्यूवर शंका उपस्थित केली आहे. जेव्हा मराठा समाज शिंदे यांच्या अंगावर आला होता. तेव्हा नेमका अजित पवार यांना डेंग्यू झाला असल्याचे विधान रामदास कदम यांनी केले. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटल्यानंतर रामदास कदम आणि गजानन किर्तीकर यांच्या वादावर पडदा पडलाय. मात्र त्याचवेळी रामदास कदमांनी अजित पवार यांच्या डेंग्यूवर विधान करून अजित पवार गटाला डिवचलंय. यावरूनच अजित पवार गटानं रामदास कदम यांच्यावर टीका केली. वर्षभरापूर्वी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीची साथ सोडली नाही म्हणून रामदास कदम यांना अश्रू अनावर झाले. तर रामदास कदम बाम लावून रडतात, असा पलटवार भास्कर जाधव यांनी केला.

Published on: Nov 16, 2023 12:52 PM