आता दसरा मेळाव्याच्या गर्दीसाठी शर्थीची लढत, औरंबादेत शिंदे-शिवसेना गटाचं चॅलेंज
शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी 100 बसमधून माणसं आणणार, असं सत्तार म्हणालेत. तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेत अंबादास दानवे यांनीही औरंगाबादमधून 20 हजार लोक आणणार असल्याचा दावा केलाय.
दत्ता कनवटे, औरंगाबादः शिंदे गट विरोधात शिवसेना असा सामना काल सुप्रीम कोर्टात (Supreme court) लढला गेला. शिवसेना कुणाची हा वाद आता निवडणूक आयोगाकडे गेला आहे. संख्याबळ कुणाचं जास्त हा मुद्दा निवडणूक आयोगाच्या (Election Commission) दृष्टीने महत्त्वाचा मानला जाणार आहे. यासाठीच आगामी दसरा मेळाव्यात (Dussehra Melava) एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमाला जास्त गर्दी जमते की उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवर जास्त लोक येतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. शिंदे गटातील नेते आणि शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते यासाठी शर्थीचे प्रयत्न करताना दिसत आहेत. औरंगाबादेतही अंबादास दानवे आणि अब्दुल सत्तार यांनी गर्दीसाठी मोठा दावा केलाय. शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी 100 बसमधून माणसं आणणार, असं सत्तार म्हणालेत. तर विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेत अंबादास दानवे यांनीही औरंगाबादमधून 20 हजार लोक आणणार असल्याचा दावा केलाय.
अटक वॉरंट पोलिसांच्या हाती! माणिकराव कोकाटेंना कधी होणार अटक?
कोकाटे प्रकरणी दानवेंची सरकारवर घटनेचा अनादर केल्याची टीका!
कोकाटेंना जामीन मिळवण्यासाठी आता कायदेशीर लढाई, वकिलांकडून मोठी अपडेट
कराड जामीन प्रकरणाच्या सुनावणीत काय-काय घडलं? वकिलांनी सारं सांगितलं

