राज्यपाल भगतसिंह कोश्यारींच्या ताफ्यातील गाड्यांना हिंगोलीत अपघात, कुणालाही दुखापत नाही
राज्यपाल कोश्यारी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला आहे. या अपक्षातात 3 गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळतेय.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांचा अपघात झाल्याची माहिती मिळतेय. राज्यपाल कोश्यारी आज हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी नरसी नामदेवकडे जाताना त्यांच्या ताफ्यातील 3 गाड्यांना अपघात झाला आहे. या अपक्षातात 3 गाड्यांचं किरकोळ नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, या अपघातात कुणालाही गंभीर इजा झाली नसल्याची माहिती मिळत आहे.
राज्यपालांकडून विकासकामांचा आढावा
महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आले होते. संविधानाने मला जे अधिकार बहाल केले आहेत त्या अधिकारांचा वापर करून मी या जिल्ह्यात आलो आहे, असं ते म्हणाले. त्यांनी सर्व कार्यालयीन प्रमुखांची बैठक घेत जिल्ह्यातील सोयी सुविधा, सिंचन, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था याबाबतची माहिती अधिकाऱ्यांकडून घेतली.