30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध लागणार,राजेश टोपेंचे संकेत

| Updated on: Apr 19, 2021 | 6:08 PM

येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध लागू केले पाहिजेत, असं राजेश टोपे म्हणाले.

मुंबई: येत्या 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनमध्ये आणखी कडक निर्बंध लागू केले पाहिजेत. विनाकारण बाहेर रस्त्यावर फिरणाऱ्या लोकांना पायबंद केलं पाहिजे. त्यासाठी किराणा दूकान हे 7 ते 11 या दरम्यान सुरु ठेवण्याबाबतची चर्चा झाली. याबाबतचा बदल कलेक्टर स्तरावावर न करता वरुनच केला जावा, अशी चर्चा झाली. दुर्गम भागातील जिल्ह्यात जेथील कलेक्टरचा संबंध रोज मंत्रालयाशी होत नाही. तिथे पालक सचिवांनी अधिक सक्रियपणे काम केलं पाहिजे. त्यांनी आपापल्या जिल्ह्यात कोरोनावर नियंत्रण ठेवावं, असा निर्णय झाला, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.