Ministry Bungalow : महायुती सरकारच्या खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?

| Updated on: Dec 23, 2024 | 5:46 PM

नवीन सरकारमध्ये चंद्रशेखर बाबनकुळे यांच्याकडे महसूल खाते याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत. यासोबत राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन हा बंगला देण्यात आलेला आहे.

महायुती सरकारच्या मंत्र्यांना खातेवाटप केल्यानंतर आता बंगल्यांचं देखील वाटप करण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांना रामटेक हा बंगला देण्यात आलेला आहे. तर पंकजा मुंडे यांना पर्णकुटी हा बंगला देण्यात आला आहे. नवीन सरकारमध्ये चंद्रशेखर बाबनकुळे यांच्याकडे महसूल खाते याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर पंकजा मुंडे या पर्यावरण मंत्री आहेत. यासोबत राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन हा बंगला देण्यात आलेला आहे. शंभूराज देसाई यांना मेघदूत तर गणेश नाईक यांना पावनगड हा बंगला देण्यात आला असून हसन मुश्रीफ यांना विशाळगड, चंद्रकांत पाटील यांना ब एक सिंहगड, गिरीश महाजन यांना सेवा सदन, गुलाबराव पाटील यांना जेतवन हा बंगला देण्यात आला आहे. जयकुमार रावल यांना चित्रकूट तर अतुल सावे यांना शिवगड हा बंगला देण्यात आलेला आहे. आशिष शेलार यांना रत्नसिंधू, दत्तात्रय भरणे यांना सिद्धगड, तर अदिती तटकरे यांना प्रतापगड, शिवेंद्र राजे भोसले यांना पन्हाळगड, माणिकराव कोकाटे यांना अंबर, जयकुमार गोरे यांना प्रचितीगड, नरहरी झिरवाळ यांना सुरुची, संजय सावकार यांना अंबर 32 तर संजय शिरसाट यांना अंबर 38 हा बंगला देण्यात आला आहे. उदय सामंतांना मुक्तागिरी तर धनंजय मुंडे यांना सातपुडा हा बंगला देण्यात आला आहे. संजय राठोड यांना शिवनेरी बंगला, गणेश नाईक यांना पावनगड, दादा भुसे यांना ब तीन जंजिरा हा बंगला देण्यात आला आहे. तर दालनापाठोपाठ आता मंत्र्यांना बंगल्यांचे देखील वाटप करण्यात आला आहे.

Published on: Dec 23, 2024 05:46 PM
Rahul Gandhi : …म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, RSS वर बोट उगारत राहुल गांधींचा मोठा आरोप
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?