धनंजय मुंडे यांच्या नावाने घोटाळा; माहिती उघड होताच मंत्रालय हादरलं...

धनंजय मुंडे यांच्या नावाने घोटाळा; माहिती उघड होताच मंत्रालय हादरलं…

| Updated on: Feb 15, 2023 | 10:15 AM

मंत्रालयातील मोठा घोटाळा उघड झाला आहे. धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती झाल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी एकाला अटक झाली आहे.

मुंबई : मंत्रालयातील मोठा घोटाळा उघड झाला आहे. हा घोटाळा माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांचं नाव घेत चालवला जात होता. धनंजय मुंडे यांच्या नावाने मंत्रालयात बोगस लिपिक भरती झाल्याची माहिती उघड झाली आहे. या प्रकरणी एकाला अटक झाली आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांसह तिघांविरुद्ध गुन्हा झाले आहेत. मंत्रालयातून चालणाऱ्या बनावट भरतीचं धक्कादायक रॅकेट उघड झालं आहे. धनंजय मुंडे यांच्या नावाचा वापर करून नियुक्ती आदेशाचे बनावट पत्र देत मंत्रालयातील कर्मचारी लिपिक भरतीचे रॅकेट चालवत असल्याचे उघड झाले आहे. बोगस लिपिक भरती रॅकेटप्रकरणी गोवंडी पोलिसांनी एका मंत्रालयीन कर्मचाऱ्यासह तिघांविरुद्ध गुन्हा नोंदवत एकाला अटक केली आहे. याप्रकरणी निखिल माळवे, शुभम मोहिते आणि नीलेश कुडतरकरविरोधात गुन्हा नोंदवत माळवेला अटक करण्यात आली आहे.यात आणखी कोणाचा सहभाग आहे का?, याबाबत चौकशी सुरू असल्याचं गोवंडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुदर्शन रघुनाथराव होनवडजकर यांनी सांगितलं आहे.

Published on: Feb 15, 2023 10:15 AM