भाजप घाबरलंय, त्यामुळे राहुल गांधींवर कारवाई; नाना पटोले यांचं टीकास्त्र
Congress Nana Patole : काँग्रेसच्या भाजपला धडा शिकवू शकतं. आम्ही लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. त्यासाठीच भाजपकडून ही सुडाची कारवाई केली जात आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
मुंबई : सुरत कोर्टाने दिलेल्या राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर मुंबईत काँग्रेस आक्रमक झाली आहे. मुंबईतील काँग्रेस कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात ,अशोक चव्हाण , विजय वडेट्टीवार ,भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे इतरही नेते या आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी नाना पटोले यांनी सरकारवर टीका केली. राहुल गांधी यांच्यावरती कारवाई करणं, हा पळपुटेपणा आहे. भाजप राहुल गांधी यांना घाबरलंय. त्यांच्या पायाखालची वाळू सरकत आहे. त्यामुळे अशी कारवाई केली जात आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
Published on: Mar 23, 2023 02:57 PM
Latest Videos