दादा भुसे यांच्या चर्चा पण तोडगा नाही; शेतकरी-कष्टकऱ्यांचा लाँगमार्च मुंबईकडे रवाना होणार
Nashik Long March : विविध मागण्यासाठी शेतकरी-कष्टकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा लाँगमार्च लवकरच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. या मोर्चात हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. पाहा व्हीडिओ...
नाशिक : विविध मागण्यासाठी शेतकरी-कष्टकरी रस्त्यावर उतरले आहेत. त्यांचा लाँगमार्च लवकरच मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. नाशिकहून निघालेल्या या लाँगमार्चच्या पदाधिकाऱ्यांशी पालकमंत्री दादा भुसे यांनी चर्चा केली. मात्र या बैठकीत तोडगा निघू शकलेला नाही. तब्बल 4 तास बैठक होऊनही मागण्या मान्य होत नसल्याने आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. आज हा लाँगमार्च मुंबईच्या दिशेने रवाना झाला आहे. पहिला मुक्काम नाशिक शहरात झाल्यानंतर आंदोलक आज दुसऱ्या दिवशी मुंबई कडे निघणार आहेत. मोर्चात हजारो शेतकरी आणि आदिवासी बांधव सहभागी झाले आहेत. मोर्चामुळे कोणत्याच शहरातील सामान्य माणसाला त्रास होणार नाही, असा शब्द आंदोलकांनी दिलाय. शिवाय शिस्तबद्ध पद्धतीने मोर्चा मुंबईत धडकणार, असंही त्यांनी सांगितलं आहे.
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज

