Video : नाशिकमध्ये रंगणार रंगोत्सव; रंगपंचमीसाठी रहाडी सज्ज
Nashik Rahadi Ranpanchami : नाशिकमध्ये आज रंगपंचमी साजरी होणार आहे. रंगपंचमीची नाशिकची परंपरा आहे. त्यासाठी शहरात पेशवेकालीन रहाडी सज्ज झाल्या आहेत. पाहा व्हीडिओ...
नाशिक : नाशिकमध्ये रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय. रंगपंचमीसाठी नाशिक शहरातील रहाडी सज्ज झाल्या आहेत. तब्बल तीन शतकांची परंपरा असणारा हा उत्सह यंदा उत्साहात साजरा केला जातोय. कोरोनामुळे दोन वर्षे परंपरा खंडित झाली होती. गेल्या वर्षी देखील कमी प्रमाणात रंगपंचमी साजरी होती पण यंदा उत्सहात सण साजरा केला जातोय. यंदा मात्र हजारो नाशिककर रंगपंचमी सणाचा आनंद लुटण्यासाठी उत्सुक आहेत. नाशिकमध्ये आज रंगोत्सव रंगणार आहे. शहरभर आज रंगपंचमी साजरी होणार आहे. रंगपंचमीची नाशिकची परंपरा आहे. त्यासाठी शहरात पेशवेकालीन रहाडी सज्ज झाल्या आहेत. रहाडीमध्ये उड्या मारण्यासाठी नाशिककर उत्सुक आहेत. शहरातील चौका चौकात पाण्याचे शॉवरही लावण्यात आले आहेत.