‘राज ठाकरे यांची डरकाळीच महाराष्ट्रातलं राजकारण ठरवणार’, कुणी दिलं वर्धापन दिनी खास भेट
VIDEO | महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस बाळा गायकवाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना दिली खास भेट
मुंबई : मनसेचा आज ९ मार्च रोजी १७ वा वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात केला जात आहे. दरवर्षी मुंबईत साजरा केला जाणारा मनसेचा वर्धापन दिन यंदा ठाण्यात साजरा होत आहे. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेचे आयोजन देखील करण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे संयुक्त सरचिटणीस बाळा गायकवाड यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना खास भेट दिल्याचे समोर आले आहे. ‘महाराष्ट्रातला आणि राजकारणातला खरा वाघ राज ठाकरे आहेत. त्यामुळे या खऱ्या वाघाला आम्ही वाघाची प्रतिकृती भेटवस्तू म्हणून दिली आहे. तसेच वाघ नखं दिली आहेत, येणाऱ्या भविष्यात राजकारणात या वाघ नखांचा उपयोग होणार आहे. एक दीड महिन्याचा काळ ही वाघाची प्रतिकृती बनवण्यास लागला आहे’, असे बाळा गायकवाड यांनी सांगितले. तर भविष्यात राज ठाकरेंची डरकाळीच महाराष्ट्रातलं राजकारण ठरवणार असल्याचे म्हणत त्यांनी वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्यात.