कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आज निकाल; मतमोजणीला सुरूवात
Agricultural Produce Market Committee Election Result 2023 : बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार? राज्याचं लक्ष, पाहा व्हीडिओ...
मुंबई : राज्यात सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचं वारं वाहतंय. राज्यभरातील 95 बाजार समित्यांचा आज निकाल लागणार आहे. मतमोजणीला आता सुरुवात झाली आहे. अमरावती जिल्ह्यातील सहा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकी पैकी 5 कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. परळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्याही मतमोजणीला सुरुवात झाली आहे. तीन टप्प्यांमध्ये परळीची मतमोजणी होणार आहे. तर नाशिक जिल्ह्यातील सहा बाजार समितीच्या निवडणुकांचे निकाल आज लागणार आहे. नाशिकमध्ये पालकमंत्री दादा भुसे आणि अद्वय हिरे यांच्यासाठी अटीतटीच्या मानल्या जाणाऱ्या मालेगाव बाजार समितीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष लागलंय. हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मतमोजणीसाठी कार्यकर्ते मतमोजणी केंद्राबाहेर जमले आहेत. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं असेल.