महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत थोड्याच वेळात सुनावणी; ‘या’ मुद्द्यावरून ठाकरेगट आक्रमक होणार
महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणीला सुरूवात होणार आहे. ठाकरे गटाचे वकील आज आक्रमकपणे बाजू मांडण्याची शक्यता आहे. पाहा...
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत सर्वोच्च न्यायालयात थोड्याच वेळात सुनावणीला सुरूवात होणार आहे. ठाकरे गटाचे वकील आज आक्रमकपणे बाजू मांडण्याची शक्यता आहे. मूळ सत्ता संघर्ष बाजूला ठेवून निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातल्या याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी ठाकरे गट करणार आहे. निवडणूक आयोगा विरोधातली याचिका ठाकरे गटासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. घटनापीठासमोर ठाकरे गटाचे वकील आजच सुनावणी होऊन निवडणूक आयोगाच्या निर्णयाला स्थगिती देण्याबाबत जोरदार युक्तिवाद करणार असल्याची माहिती आहे.
Published on: Feb 21, 2023 10:17 AM
Latest Videos
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
BJP पदाधिकाऱ्याचं अजब कांड, मतदारांना पैशांचे आमिष दाखवलं अन् कोंडून..

