Maharashtra Politics : नार्वेकर यांच्या लंडनमधील ‘त्या’ वक्त्याचा राऊत यांनी घेतला समाचार; म्हणाले… ‘आश्चर्य’
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा आपल्याला काही आश्चर्य वाटतं नसल्याचे म्हटलं आहे.
मुंबई : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर निकाल आता आहे. तर 16 अपात्र आमदार याचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे गेलं आहे. यावरून त्यांनी एका खासगी वृत्तपत्राला मुलाखत दिली. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी नार्वेकर यांच्यावर पुन्हा एकदा निशाना साधला आहे. तर त्यांच्या अशा या वक्तव्याचा आपल्याला काही आश्चर्य वाटतं नसल्याचे म्हटलं आहे. कारण पक्षांतराविषयी त्यांना तिरस्कार नाही. त्यांनी अनेक पक्ष बदललेली आहेत. त्यांना लोकशाहीची चाड नाही. त्यांना एखाद्या पक्षाची निष्ठा नाही असा घणाघात केला आहे. तर त्यांच्या अशा या वक्तव्यामुळे या खटल्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे बाहेर बसून दबाव आणणारे वक्तव्य न करत त्यांनी आधी मुंबईत यावं, खुर्चीवर बसावं आणि मग आमचे जी काही भूमिका आहे ती समजून घ्यावी. त्याचबरोबर त्यांना शिवसेना काय आहे हे देखील माहित आहे त्यामुळे आम्हाला तोंड उघडायला लावू नका असा इशारा देखिल त्यांनी नार्वेकर यांना दिला आहे.