Maharashtra Political Crisis | उद्धव ठाकरे यांची कोश्यारी यांच्यावर घणाघाती टीका; म्हणाले, वस्त्रहरण झालं…
त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करताना, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आजच्या निर्णयाने सत्तेसासाठी हपापलेल्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड केली असं म्हटलं आहे.
मुंबई : राज्यातील सत्ता संघर्षावर (Maharashtra Political Crisis) सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. या निकालात राज्यपालांच्या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयाने जोरदार ताशेरे ओढले. त्यावरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी तत्कालीन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांच्यावर टीका करताना, सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. आजच्या निर्णयाने सत्तेसासाठी हपापलेल्या उघड्यानागड्या राजकारणाची चिरफाड केली असं म्हटलं आहे. तर हा केवळ शिवसेनेसाठी निकाल नव्हता. तर लोकशाही जिवंत राहणार की नाही यावर निर्णय झाला. सत्तेसाठी हपापलेल्या लोकांचं उघडं नागड्या राजकारणाची चिरफाड ही सर्वोच्च न्यायालयाने केली. तसेच तत्कालीन राज्यपाल यांची भूमिका संशयास्प होती. ती सरळ सरळ अयोग्य होती. त्याचं आज वस्त्रहरण झालं. राज्यपाल ही यंत्रणा आदरयुक्त होती. त्याचे धिंडवडे शासनकर्त्यांनी काढले असं ही टीका ठाकरे यांनी केली. राज्यपालांना अधिवेशन बोलावण्याचा अधिकार नव्हता, असं उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.