मंत्रिमंडळाचा विस्तार बच्चू कडूंची प्रतिक्रिया; ”आमंत्रण! घोडा मैदान…” अन् केली ‘ही’ मागणी?
येत्या 8 ते 10 दिवसात होईल अशी अशा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी स्पष्ट केल्याने आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिय दिलेली आहे.
अमरावती : महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याच्या विविध चर्चा रंगल्या आहेत. तर मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल असं तर येत्या 8 ते 10 दिवसात होईल अशी अशा असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी स्पष्ट केल्याने आता याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. यादरम्यान प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिय दिलेली आहे. त्यांच्या या प्रतिक्रियेची सध्या चर्चा होते आहे. त्यांनी, मंत्री झालो तर अधिक वेगाने काम करेन. पण मंत्रिमंडळाचा विस्तारतर झाला पाहिजे. विस्तार तातडीने होणं गरजेचं असल्याचं म्हणत टोला लगावला आहे. तर घोडा मैदान जवळच आहे, लढाई आहे. मंत्री नाही झालो तरी कामं करतोय. जेवणाचं आमंत्रण जेवल्या शिवाय खरं नसतं. असे बच्चू कडू म्हणाले. प्रत्येक जिल्ह्याला स्वतंत्र पालकमंत्री मिळणं आवश्यक आहे. ही जनतेची मागणी आहे.” असं वक्तव्य कडूंनी केलं आहे.