संजय राऊत यांच्यावर शिवसेना मंत्र्याची सडकून टीका, म्हणाले, माणूस...

संजय राऊत यांच्यावर शिवसेना मंत्र्याची सडकून टीका, म्हणाले, माणूस…

| Updated on: May 14, 2023 | 8:59 AM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिंदे-फडणवीस सरकार हे असंवैधानिक असल्याचे म्हटलं. तसेच ते तीन महिन्यांत कोसळेल असा दावा राऊत यांनी केला.

बुलढाणा : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाचे नेते राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी भाजपसह शिंदे गटावर हल्लाबोल केला होता. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिंदे-फडणवीस सरकार हे असंवैधानिक असल्याचे म्हटलं. तसेच ते तीन महिन्यांत कोसळेल असा दावा केला. त्यावरून त्यांच्यावर भाजप नेते नितेश राणे यांच्यासह अनेकांनी टीका केली आहे. याचमुद्द्यावरून आता शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते आणि राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी सडकून टीका केली आहे. त्यांनी राऊतांसंदर्भात प्रश्न केला असता हा काय बोलण्याचा विषय आहे का? त्यांच्यावर काही बोलावं असा माणूस नाही तो असा टोला लगावला आहे.

Published on: May 14, 2023 08:59 AM