दुसऱ्याच्या घरात आम्ही डोकावत नाही.... नाना पटोले याचं कशावर रोखठोक उत्तर

दुसऱ्याच्या घरात आम्ही डोकावत नाही…. नाना पटोले याचं कशावर रोखठोक उत्तर

| Updated on: May 03, 2023 | 1:46 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणातून निवृत्त होत आहोत तर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे.

मुंबई : राज्यात एकीकडे उलतापालथीचे राजकारण सुरू असता आणि महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निर्णय येण्याची शक्यता असतानाच राज्यात दुसरा भूकंप झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपण राजकारणातून निवृत्त होत आहोत तर अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. तर राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनी राजीनामे दिले आहेत. यादरम्यान राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष कोण यावर ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचा नावा अध्यक्ष म्हणून अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल पटेल यांच्या नावाची चर्चा सुरू आहेत. त्यावर विचारलेल्या प्रश्नांवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना, राष्ट्रवादीचा पुढचा अध्यक्ष कोण होईल यावर आम्ही बघत नाही. दुसऱ्याच्या घरात आम्ही डोकावत नाही, अशी प्रतिक्रिया दिली आहे.

Published on: May 03, 2023 01:45 PM